- महिलेची पोलिसात धाव; आरोपीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२२) :- फेसबुक व इंस्टाग्राम यावर फिर्यादी व त्यांच्या आईच्या फोटोंचा व इतरांच्या नावाचा वापर करून अकाउंट तयार केले. त्या माध्यमातून फिर्यादी, त्यांची आई व वहिनींबद्दल अश्लील मेसेज केले.
सोशल मीडियावर फिर्यादीच्या परिवाराची बदनामी केली. ही घटना भोसरीत घडली. २६ वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. श्रीकांत दिलीप गायकवाड (वय ३२, रा. महालक्ष्मीनगर, जेल रोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.
















