- अवैध हुक्काप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२२) :- किवळेतील बॅचलर फॉरेस्ट अँड रेस्टो येथे ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी बसवून हुक्का उपलब्ध करून दिला. पोलिसांनी येथे छापा टाकताच दोघे आरोपी पसार झाले. त्यापैकी एकाने अवैध धंद्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
या कारवाईत पोलिसांनी ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ऋषिकेश राजू कस्पटे, आत्माराम परशुराम कस्पटे (दोघेही रा. वाकड), हॉटेलचा जागा मालक शुभम धुमाळ (रा. किवळेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.















