न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२२) :- आपसात संगनमत करून आरोपीनी ५ फेब्रुवारी २०१८ ते आतापर्यंत फ्लॅट नं ४०१, ४०४ अथर्व गॅलॅक्सी, चौथा माळा, भूमकर चौकाजवळ, वाकड ह्या मिळकतीवर तारण कर्ज मिळविले. त्यासाठी आरोपीने सन २०१४-१५, २०१५-१६ रिटर्न चुकीचे त्याचप्रमाणे अॅक्सिस बँकेच्या बचत खात्याचे १ ऑक्टोबर २०१६ ते २७ डिसेंबर २०१७ दरम्यानचे बँक स्टेटमेंट बनावट सादर केले.
साऊथ इंडियन बँकेकडून ६५ लाख रुपये मिळकत तारण कर्ज घेऊन फसवणूक केली. सौम्या नायर, मॅनेजर, साऊथ इंडियन बँक लि, वाकड शाखा यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नील भूमकर (रा.भूमकर वस्ती, हिंजवडी वाकड) असं या आरोपीच नाव आहे. दुसरा आरोपी हा वाकड पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालीन कोठडीत आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.


















