न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२२) :- राहत्या घरासमोर रस्त्याच्या कडेला तब्बल अडीच लाख रुपये किमतीचा दहा चाकी ट्रक पार्क केला होता. अज्ञात चोराने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता फिर्यादीच्या संमतीशिवाय हा ट्रक चोरून नेला आहे.
ही घटना शनिवारी (दि. २) रोजी कुणाल बिल्डिंग, मोशी रोड, कुदळवाडी, चिखली येथे घडली. मोहंमद खान (वय ५२ वर्षे, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.