- वीस वर्षीय आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२२) :- महिलेचे लग्न झालेले व लहान मुलगा असल्याचे माहित असताना देखील आरोपीने फिर्यादीसोबत मैत्री करून फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी यांच्या राहत्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पीडित २६ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित पाचारणे (वय अंदाजे २० वर्षे, रा. आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.