न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२२) :- वाल्हेकरवाडी आणि रावेत येथे गुरुद्वारा चौक ते धर्मराज चौकालगत अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर आज सोमवारी (दि. ४) रोजी महापालिकेच्या ‘ ब ‘ क्षेत्रिय कार्यालया मार्फत कारवाई करण्यात आली.
कारवाईत २१ पत्राशेड, ५ टपरी असे एकुण (२६) बांधकामे अंदाजे १०८१.२५ चौ.मी. (१९६३४.२५ चौ. फुट) अनधिकृत व्यवसायिक पत्राशेड निष्कसित केली.
ही कारवाई जितेंद्र वाघ मा. अतिरिक्त आयुक्त (२) मकरंद निकम अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आली. ही कारवाई अभिजित हराळे क्षेत्रिय अधिकारी ‘ ब ‘ प्रभाग व येथील धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिनेश नेहरकर, अमोल पवार व १ सुपरवायझर तसेच मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी व चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक १, उपनिरीक्षक २ आणि पोलिस कर्मचारी १० व महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ३२ कर्मचारी आणि २ जेसीबी ४ डम्पर व १० मजुर यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली.