न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०२२) :- दुकान आरोपींच्या घराशेजारीच आहे. आरोपी हे फिर्यादीच्या दुकानात आले व बाकीचे सर्वजण बाहेर थांबले. त्यावेळी आत आलेल्या दोन आरोपींनी फिर्यादीकडे सिगारेट मागितली. सिगारेट विकत नसल्याचे फिर्यादीने आरोपींना सांगितले. या कारणावरून दोन आरोपींनी फिर्यादीच्या कानाखाली मारले. दुकानातील बरण्या व सामान फेकून दिले.
त्यावेळी दुकान मालकीण व त्यांच्या घरातील लोक सोडवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांना ढकलले. आरोपींनी दुकान मालकाच्या घरावर दगड फेकून मारले. त्यातील एक दगड दुकान मालकीनीच्या भाच्याच्या डोक्यात लागून तो जखमी झाला. काही आरोपींकडे लोखंडी कोयते होते. त्यांनी लोकांना शिवीगाळ केली व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मारहाण केली व पोलिसात तक्रार केली तर मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार ३ जुलै रोजी बोपखेल येथे घडला. लक्ष्मण भाटी (वय ४२ वर्षे, रा. बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार यश उर्फ बबलू दिसले (रा. गणेशनगर, बोपखेल), तेजस खरात आणि तुषार होंगरे (रा. रामनगर, बोपखेल), बबलू घुले (रा. बोपखेल) इतर ३ ते ४ जण (सर्वांचे वय २० ते २५ वर्षे, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
















