न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथीदारांच्या विरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
जाधवच्या साथीदारांनी नारायणगाव भागातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितली होती. याप्रकरणी संतोष सुनील जाधव (रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे), जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात (दोघे रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे), जयेश रतीलाल बहिरट, जिशान इलाहीबक्ष मुंढे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे), गणेश तारू, वैभव ऊर्फ भोला शांताराम तिकटारे (रा. जळकेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), रोहित विठ्ठल तिकटारे (रा. बबन तिकटारे (रा. नायफड सरेवाडी, ता खेड, जि. पुणे), सचिन (जि. पुणे) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
नारायणगावमधील व्यावसायिकाकडे संतोष जाधव टोळीतील एका साथीदारांनी खंडणी मागितली होती. व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव डॉ. अभिनव देशमुख, मितेश घट्टे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे मनोज लोहिया महानिरीक्षक यांच्याकडे सादर केला होता.
जाधव याने वैमनस्यातून गेल्या वर्षी मंचर परिसरात ओकार ऊर्फ बाणखेले याचा खून केला होता. या प्रकरणात त्याच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर जाधव मध्यप्रदेश राजस्थानमध्ये पसार झाला होता. त्यानंतर पंजाबमधील गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. बिष्णोई टोळीने सिद्धू मुसेवाला याची हत्या घडवून आणली होती.