न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात एक व्हिडिओ सोशल मीडियावर वा-यासारखा पसरला आहे. गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या व्हिडिओला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले आहे.
मात्र, हा व्हिडिओ चिंचवडमधील नसून पालघरमधील कर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी मार्टचा आहे. पालघर पोलिसांनी येथे मॉकड्रिल केले आहे.