न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि, १५ फेब्रु.) :- जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांना न्यू सिटी प्राईड स्कूलच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष, भगवान गोडांबे, दत्तात्रय कुटे, संजय कुटे, राकेश भास्कर, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.











