न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाच्या सुनेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. प्रियंका अभिषेक उमरगेकर-घोलप (वय २४, रा. आळंदी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या प्रियंका या सून होत्या. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांच्या त्या कन्या होत्या.
प्रियंका यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पाच महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.