- दिघीतील घटना; चौघांवर गुन्हा दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- १ जुलै रोजी फिर्यादीचा वाढदिवस होता. वाढदिवसाची पार्टी ३ जुलैला देण्याचे ठरले. त्यानुसार आरोपी आणि इतर मित्रांना दारू पार्टीसाठी फिर्यादीने बोलवले. पार्टितच फिर्यादी व त्यांच्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला उसने पैसे देण्याच्या निमित्ताने शनिवारी (दि. ९) दिघी येथील साई पार्क रोडवर बोलवले.
त्यानुसार फिर्यादी व त्यांचा मित्र हे आरोपीला भेटण्यासाठी गेले. यावेळी आरोपीने व त्याच्या साथीदाराने फिर्यादीसह त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी तरूण गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना दिघी येथे शनिवारी (दि. ९) सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. जय संजय मोहीते (वय २० वर्षे रा. भोसरी) यांनी रविवारी (दि. १०) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहितेचे मित्र राज पेटकर, सोन्या वैरागी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.