न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- भागीदारीत लिफ्ट प्रोजेक्टचा व्यवसाय करू असे आमिष आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून ३८ लाख ३५ हजार ५० रुपये घेतले. फिर्यादी यांचे नातेवाईक आणि मित्राकडून घेतलेले पैसे आणि घरातील सोने असे १४ लाख ६५ हजार रुपये पुन्हा आरोपींना दिले.
फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपींना ५३ लाख ५० रुपये दिले. आरोपींनी नफा म्हणून १६ लाख रुपये रोख स्वरूपात फिर्यादींना परत दिले. उर्वरित गुंतवलेली ३४ लाख ५० रुपये रक्कम न देता त्याची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१८ ते २०१९ या दरम्यान नखातेनगर, थेरगाव येथे घडला.
महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद सिली आहे. त्यानुसार रवींद्र मारुती त्र्यंबके (वय ३१, मुकाई चौक, रावेत), चंद्रमणी लोखंडे (रा. अंबरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.