न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ५९ प्रकारचे स्टेशनरी साहित्य महापालिका खरेदी करणार आहे. या खर्चाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेने निवडणूक साहित्याची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीसाठी विविध स्टेशनरी वस्तूंची आवश्यकता असते.
पालिकेच्या निवडणूक विभागाच्या मागणीनुसार ५९ स्टेशनरी वस्तूंसाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. यामध्ये मे. शिवसमर्थ एंटरप्रायजेस, निगडी यांनी सर्वात कमी दराची म्हणजे १७ लाख ७२ हजार ८७७ रूपयांची निविदा सादर केली होती. २२ लाख ५४ हजार २१० टक्यांनी कमी आहे. त्यानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आवश्यक स्टेशनरी साहित्य मे शिवसमर्थ एंटरप्रायजेस यांच्याकडून ५९ स्टेशनरी साहित्य खरेदी करणार आहे.