- फ्लॅट खरेदी केल्यानंतरही ताबा न देता महिलेची ३५ लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२२) :- २०१३ साली राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, ए विंग फ्लॅट क्रमांक १०२, तिरुपती चौक, इंद्रायणी नगर, भोसरी येथे फिर्यादीने फ्लॅट खरेदी केला. फ्लॅट खरेदी केल्यानंतर अद्यापपर्यंत ताबा व भोगावटा प्रमाणपत्र न देता आरोपींनी फिर्यादी यांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
तसेच आरोपी यांनी बिल्डरशी संगनमत करून उपनिबंधक कार्यालयास खोटी माहिती पुरवून सोसायटी स्थापन केली. फिर्यादी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिल्डर सुरेश गामी (गामी ग्रुप), सोसायटीचे खजिनदार अजिंक्य ताम्हाणे, अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सेक्रेटरी सचिन साळुंके, सदस्य संदिप वामण, सदस्य व इतर पदाधिकारीही आरोपी आहेत. त्यामुळे आरोपीच्या विरोधात मोफा ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.