न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रु.) :- राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज शनिवार (दि. १६) रोजी सकाळी ९ .३० वा. रहटणी फाटा, काळेवाडी मेन रोड या ठिकाणी शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष उमेश लोहार, युवक अध्यक्ष छत्रपाल सांगोलकर, शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष हारिश मोरे, सरचिटणीस भालचंद्र फुगे आणि छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील, अपना वतन संघटनेचे सिद्दिकी शेख, संतोष कांबळे, आबादास तावडे, शिवाजी सगर, नवनाथ टेगले व सर्व संघटनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











