न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रु.) :- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (निमा) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने डॉक्टरांच्या घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत इंसाइट पुरस्कृत भोसरी संघाने विजेतेपद पटकावले. तर चिंचवड उपविजेता संघ ठरला. निमा आयोजित क्रिकेट स्पर्धेत भोसरी (एबीसीडी) संघाने सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले.
बक्षीस वितरण प्रसंगी निमाचे सचिव डॉ. अभय तांबीले, खजिनदार डॉ. रमेश केदार, विमा प्रमुख डॉ. प्रज्ञा खोसे, इंसाइट ऑप्थल्मॉलॉजी इंस्टीट्यूटचे संचालक डॉ. अभिजीत आग्रे, निमाचे क्रीडाप्रमुख डॉ. संजीव पाटील, आळंदी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मॅन ऑफ़ दि सिरीज व बेस्ट बॅटसमनचा किताब डॉ. रौनक महाजन यांना दिला. मॅन ऑफ मॅचचा किताब अमृत पेरणे यांना देण्यात आला. डॉ. दीपक चौधरी हे बेस्ट बॉलर ठरले. डी. वाय. पाटील ग्राऊंडवर संपन्न झालेल्या या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते.











