न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या २७ उपअभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्त राजेश पाटील यांनी तसा आदेश काढला. त्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
एका विभागात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या अधिकाऱ्यांची बदली टप्पाटप्प्याने करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या विविध विभागात बदल करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात स्थापत्य विभागाच्या २७ उपअभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य, पाणीपुरवठा, झोनिपु स्थापत्य, बांधकाम परवानगी, नगरचना आदी विभागात बदली करण्यात आली आहे.
स्थापत्य विभागाच्या कनिष्ठ अभियंता असलेल्या १७ अधिकाऱ्यांना उपअभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती समितीच्या १३ जूनला झालेल्या सभेच्या शिफारशीनुसार व सेवा ज्येष्ठतेनुसार ही पदोन्नती करण्यात आली आहे. विविध वर्गातील सात लिपिकांची पदोन्नती कायम करण्यात आली आहे. आरेखक या पदावर एका कर्मचाऱ्याची पदोन्नती कायम करण्यात आली आहे.














