न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२२) :- ओळखीच्या महिलेशी तरुणाचे प्रेम संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच रागातून आरोपींनी मुंबई-पुणे महामार्गावरील किवळे गावाजवळील मोकळ्या जागेत तरुणाला दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
हा प्रकार शनिवारी (दि. १६) मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान घडला. आदेश लालू बुरुड (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या बहिणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शैलेश जांभूळकर व साहिल जाधव यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. रावेत पालीस पुढील तपास करीत आहेत.