- जीवे मारण्याची धमकी; पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२२) :- रात्रीच्या वेळी कामावरून फिर्यादी दुचाकीवरून घरी जात होते. पिंपरीतील लालटोपीनगर येथील सम्राट चौकात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला आरोपींनी ओव्हरटेक करीत त्यांची दुचाकी थांबविली.
दुचाकीवरील तिघेजण फिर्यादी यांना ”युनियन सोडून दे, कंपनी सोडून दे” असे म्हणत होते. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात आणि पायावर प्लास्टिक पाईपने मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देत पळून गेले.
हा प्रकार शुक्रवारी (दि. १५) रोजी घडला. संजय बापू कदम (वय ३१ रा. एमआयडीसी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिपरी पोलीस तपास करीत आहेत.