- मा. स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२२) :- कुदळवाडी परिसरातील मुख्य रस्त्यावरील खड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील खड्डे तातडीने बुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा. तसेच भैरवनाथ मंदिर रोड, जय गणेश वजन काटा, शिवसाई वजन काट्यासमोरील भाग, रिगल रेसीडेन्सी परिसरातील रस्ता खराब झाल्याने या रस्त्यावर गंभीर अपघात होत आहेत.
या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी प्रभागाचे माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी पालिकेच्या क प्रभाग स्थापत्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक संथ गतीने होत आहे. या खड्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची पाहणी करून रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, असे या निवेदनात दिनेशयादव यांनी म्हटले आहे.