- बारा तासात पोलिसांनी आरोपींना केले गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२२) :- पिंपरीतील फिनोलेक्स चौकात फिर्यादीचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. आरोपी रविवारी (दि. १७) सायंकाळी सहा च्या दरम्यान फिर्यादी यांच्या दुकानात चप्पल खरेदीसाठी आले. चप्पलच्या किमतीवरून आरोपींनी फिर्यादी सोबत वाद घातला.
त्यांना शिवीगाळ करून कमरेला असलेला कोयता काढून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानदार महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किरण बिराजदार (वय २०, रा. मोहननगर, चिंचवड), अजय लक्ष्मण जकाते (वय २०, रा. काळेवाडी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.