न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२२) :- आदर्श माता कै. सौ. सुगंधाबाई तान्हाजी थोपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील थोपटे मळा येथे बुधवारी (दि. २०) भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार हभप शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची किर्तन सेवा होणार आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन संदेश थोपटे, उद्योजक बबनराव थोपटे, सामाजिक कार्यकर्ते संजय थोपटे यांनी केले आहे, अशी माहिती भोसरीतील कायदा तज्ञ अॅड. बाळासाहेब थोपटे यांनी दिली आहे.