न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२२) :- चिंचवडमधील रामनगर येथील रस्त्यावर फिर्यादी शनिवारी (दि. १६) त्यांची पिकअप घेऊन थांबले होते. यावेळी संबंधित अल्पवयीन मुले व त्यांचे साथीदार तेथे आले व त्यांनी फिर्यादीकडून जबरदस्ती १५ हजार रुपये व ५ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला.
परिसरात उभ्या असलेल्या सात ते आठ गाड्यांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. बळीराम सुभाष बिराजदार (वय ३४ रा. भोसरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांचे इतर ४ ते ५ साथीदार फरार झाले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.