- दस्त नोंदणीवर आकारणार एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दस्त नोंदणीवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर आता आठ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर आता एकूण ७ टक्क्यांऐवजी (नोंदणी शुल्क धरून) आठ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. आठ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क विभागाला देण्यात आले आहेत.











