न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- समाजवादी पक्षाच्या वतीने पिंपरी येथे आंबेडकर चौकात पुलवामातील दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय शहीद जवानांना आदरांजली वाहून, दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली. यावेळी कैंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष रफिकभाई कुरैशी, सालारभाई, बाबा नदाफ, इमामभाई, नरेंद्र पवार, विकास वाघमारे, बी. डी. यादव, शाहरुख, पप्पू, मुक्तार पठान, वाहिदा शेख, आर. एफ. सैय्यद, साधना तिवारी, शैख़ मैडम, शहनाज शैख़, जुबेदा शैख़, योगिता शिंदे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.











