न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- दिघी येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी निकालामध्ये १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एकूण २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. अनिशा जाधव हि विद्यार्थ्यांनी ९८.२ टक्के मार्क मिळवत प्रथम आली. ९८ टक्के मार्क मिळवित ओवी यादव दुसरी तर तृतीय क्रमांक संध्या पाटील हिला ९७.६ टक्के मार्क मिळाले.
इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये शास्त्र विज्ञान शाखेत हिप्परगी कर अंकिता तिला ९६ टक्के, श्रेयस कुमार ९५.८ टक्के, कॉमर्स विभागात मानसी चव्हाण या विद्यार्थिनीला ९६. टक्के, अनुष्का ९३. २ टक्के तर कला शाखेत दिव्या गुप्ता या विद्यार्थ्यांना ९०.८ टक्के, द्वितीय क्रमांक सलमा शेख हिला ८६.६ टक्के मार्क मिळवत शाळेने यश मिळवले आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन शाळेच्या प्राचार्या यास्मिन कौर यांनी केले आहे.