- सर्वपक्षीयांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांविरोधात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२२) :- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना प्रशासक म्हणून मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवला आहे. महापालिका रुग्णालय आणि दवाखान्याच्या औषध उपचाराच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. झोपडपट्टीतील नागरिक, कामगार, मजूर, गरीब पालिका रूग्णालयात उपचार घेतात. प्रशासकांच्या मनमानी निर्णयाला स्थगिती द्या.
पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे शालेय साहित्य टक्केवारीच्या राजकारणामुळे अडकून पडले आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळत नाही, याला पालिकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. हे साहित्य वाटप तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी द्यावेत.
याविषयी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत शहरातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी (२८ जुलै) पिंपरी पालिकेच्या मुख्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येणार आहे.