- कंपनीकडून मोठे नुकसान झाल्याचे स्पष्टीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- पिंपरी एमआयडीसीतील एक्स. ए. एल टूल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील उत्पादन बंद केल्याने ५४ कामगार, व्यवस्थापनातील २० अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या १५ ते २० कामगारांवर बेकारीची कुन्हाड कोसळली आहे. कंपनीकडून कामगारांना देव असलेली देणी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहेत.
कंपनीचे उत्पादन थांबविण्यापूर्वी कामगाराना याबाबत पूर्वकल्पना देण्यासाठी नोटीस देणे अपेक्षित होते. मात्र तसे न केल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. व्यवस्थापनाने याबाबत कामगाराना ई – मेल पाठविला होता. तसेच, कंपनीचे काम बेकायदा थांबवलेले नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. कंपनीमध्ये विविध एलईडी दिवे बनविण्याचे काम २३ तारखेपर्यंत होते. मात्र २४ तारखेला रात्री ई मेलद्वारे कामगारांना बडतर्फीचे पत्र पाठविले. कामगारांनी आंदोलन केले. दरम्यान चर्चा करण्यासाठी व्यवस्थापनाकडून सोमवारी (दि. १) बैठक होणार आहे.
कंपनी बेकायदेशीरपणे बंद केली आहे. कंपनी बंद करण्यापूर्वी कामगारांना पूर्वकल्पना देण्यासाठी नोटीस बजावणे आवश्यक होते. गेल्या १४ ते १५ वर्षांपासून येथे कामगार काम करत होते. त्याविरुद्ध आम्ही कामगार उपायुक्त कार्यालयात तक्रार दिलेली आहे. तसेच, कायदेशीर लढाई देखील लढणार आहोत.
– संतोष बेंद्रे, अध्यक्ष शिवगर्जना कामगार संघटना…आर्थिक परिस्थितीमुळे कामगारांना कोणतेही अर्थपूर्ण काम देऊ शकत नाही. पर्यायाने, आम्हाला रविवारी (दि. २४) कामगारांना नोकरीवरून कमी करणे भाग पडले. कामगारांची सर्व कायदेशीर देणी आम्ही अदा केली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीला गंभीर नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने कंपनीला हे पाऊल उचलावे लागल आहे.
– अलेस्सांद्रो लॅम्ब्रुची – व्यवस्थापकीय संचालक, एक्सएएल टूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड…
















