न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- रॅपीडो (ओला-उबर) चालक गुरुवारी त्यांची रॅपीडो (ओला-उबर) दुचाकी घेऊन पिंपळे सौदागर येथील बिल्डिंगजवळ थांबले होते. यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना तू धंदा का करतोस म्हणत शिवीगाळ करत हाताने मारहाण केली व त्यांच्याजवळील ६ हजार रुपये काढून घेतले.
हा प्रकार गुरुवारी (दि. २८) रात्री साडे आठच्या सुमारास घडला. जनार्दन जालींदर कसबे (वय. ३९ रा.चिंचवड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रवी महेश जगताप (वय २२ रा. थेरगाव गावठाण) असे अटक आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.