- पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- शहरातील काही मोठ्या हाउसिंग सोसायट्या खर्च जास्त होत असल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद ठेवतात. तसेच एसटीपीचे पाणी बाग व झाडांसाठी न वापरता पिण्याचे पाणी वापरतात. त्यामुळे अशा नियम तोडणाऱ्या सोसायट्यांना दररोज ३०० ते ५०० रूपये दंड केला जाणार आहे. तसेच, पिण्याचा पाण्याचा जोड तोडण्यात येणार आहे, त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.
हाऊसिंग सोसायट्यांना एसटीपी किंवा ईटीपी सुरु करणे बंधनकारक आहे. एसटीपीचे चालन, देखभाल व दुरुस्तीसाठी अनुभवी कामगार नसणे. वीज बिल अधिक असणे. अशा कारणांमुळे एसटीपी कायम सुरू ठेवले जात नाहीत.
एसटीपी कार्यान्वित नसल्याने वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. एसटीपी कायम सुरू ठेवण्यासाठी सोसायट्यांच्या समस्या दूर करण्यासाठी पालिकेने सल्लागार एजन्सीचे पॅनल नेमले आहे. सल्लागार सोसायटींना मदत करणार आहेत.


















