न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- तरुणी आणि आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. आरोपींनी तरुणीचा पाठलाग केला. तू आम्हाला आवडतेस, असे एक संशयित आरोपी म्हणाला. त्यानंतर तरुणीला जवळ ओढत तिच्याशी गैरवर्तन केले. तिने विरोध केला असता संशयित आरोपीने अंगावर मिरचीचे पाणी ओतले. तसेच गैरवर्तन केले.
तू आमच्या विरोधात तक्रार केली तर तुला सोडणार नाही, अशी धमकीही आरोपींनी पीडितेला दिली. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
चिखली गावठाण येथे शनिवारी (दि. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी २१ वर्षीय पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कृष्णा भाऊ मोरे (वय २७, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह कुणाल भंडारी याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.