- यंदा मालमत्ता करात कोणतीही करवाढ नाही
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रु.) :- आशिया खंडातील श्रीमंत’ महापालिका अशी पिंपरी-चिंचवड महापालिकेची ओळख आहे. शहरातील नागरिकांना पायाभूत तसेच इतर सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कायमच सक्षम असते व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही महत्वाची ठरते.
दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहराचे आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधा तसेच इतर विविध विकास प्रकल्पांसाठी सन २०१९- २० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्याचे आज सोमवार (दि. १८) रोजी महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी या आर्थिक अंदाजपत्रकाचे स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड व सदस्यांपुढे सादरीकरण केले आहे. महापालिकेचा हा ३७ वा अर्थसंकल्प आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी हे आर्थिक अंदाजपत्रक एकूण मूळ ४६२० कोटी रुपये तर जेएनएनयूआरएम या योजनेसह ६१८३ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला आहे. या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट म्हणजे यंदा मालमत्ता करात कोणतीही करवाढ केलेली नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेने अर्थसंकल्पात काही ठळक विषयांचा अंतर्भाव केला आहे तो असा :-
नदी सुधार प्रकल्प – २०० कोटी, मेट्रो प्रकल्पासाठी – ५ कोटी, भामा आसखेड – २८ कोटी, रावेत बंधारा – ५.७५, हरीस पुलास समांतर पुल बांधणी – २ कोटी, वैद्यकीय – १७१ कोटी, शहर रचना व नियोजन – ५० कोटी, आरोग्य – २४२ कोटी, प्राथमिक व इतर शिक्षण – १९१ कोटी, उद्यान व पर्यावरण – ८३ कोटी, इतर विभाग सेवा – ४९३ कोटी, स्मार्ट सिटी प्रकल्प – १५० कोटी, प्रधानमंत्री आवास योजना ३६.३९ कोटी, पीएमपीएमएल – १९०. ८२ कोटी











