न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड मनपाच्या नगरसेविका अनुराधा गोरखे व उद्योजक अमित गोरखे यांनी रविवार (दि. १७) रोजी पुणे येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व चिंचवड येथे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सहपरिवार भेट देऊन, मानवंदना दिली.
याप्रसंगी चिंचवड येथील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना मानवंदना देताना नगरसेविका अनुराधा गोरखे व उद्योजक अमित गोरखे यांच्यासमवेत महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, महापालिका पदाधिकारी तसेच पुणे येथे लहुजी स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, आसाराम कसबे, रामदास साळवे, युवराज दाखले, शंकर शिंदे, भानुदास नेटके, राजू आवळे, दीपक चखाले, सचिन कुचेकर, सचिन सकटे व आदी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.











