न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १८ फेब्रु.) :- चिंचवडमधील एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट या शैक्षणिक संस्थेस हैद्राबाद येथील ‘९ व्या उच्च शिक्षण आणि मानव संसाधन परिषदे’ चा ”बेस्ट स्कूल” हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
तेलंगाना सरकारच्या इंटरमीडिएट एज्युकेशनचे आयुक्त व सचिव डॉ. अशोक यांच्या हस्ते एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे चेअरमन संदीप पाचपांडे यांना नुकताच ‘बेस्ट स्कूल’ हा किताब देऊन गौरविण्यात आले आहे.
तेलंगाना स्टेट कौन्सिल ऑफ हायर एजुकेशन (टीएससीईई), कॉलेजिएट आणि टेक्निकल एज्युकेशन विभाग, इंटरमीडिएट एज्युकेशन ऑफ बोर्ड एलिट टेक्नोमिडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहयोगाने हैदराबाद येथे ४ आणि ५ फेब्रुवारी दरम्यान ‘९ व्या उच्च शिक्षण आणि मानव संसाधन परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते.
या दोन दिवसीय परिषदेत उच्च शिक्षण, कौशल्ये आणि व्यावसायिक शिक्षण धोरण निर्माते व शिक्षण संस्था प्रमुख तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ञांचा समावेश होता. या परिषदेस कॉर्पोरेट कंपन्यांच्या वतीने ५० हून अधिक मानव संसाधन प्रमुख या परिषदेत सहभागी झाले होते. यात शिक्षण क्षेत्रातील अनेक विषयावार चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.











