न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- रहाटणी कोकणे चौकातील महाराष्ट्र टी सेंटर येथे फिर्यादी हे मंगळवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान त्यांचे मित्रासोबत चहा पिण्यासाठी गेले होते. फिर्यादीच्या भावाचे चार मित्र येथे आरोपी आले व त्यांनी इतर ३ ते ४ मित्रांना बोलावून घेतले.
फिर्यादीच्या भावासोबत अण्णा भाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यात वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून आरडाओरड करून परिसरात दहशत निर्माण करून तेथून पळून गेले.
प्रवीण देवकर, (वय २१ रा. रामनगर रहाटणी मूळ जिल्हा बुलढाणा) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बबलू तलवारे, (वय २०), अजय कांबळे (वय २१), सुनील कांबळे (वय १९), संदीप (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्याच्या सोबत राहणारे ३ ते ४ जण (सर्व रा. रहाटणी) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












