न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १८ फेब्रु.) :- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोरे वस्तीमधील राजगड पार्कच्या नागरिकांनी कॅंडल मार्च काढून निषेध नोंदवला. या मार्चमध्ये राजगड पार्क १ ते ६ मधील सुमारे दोनशे नागरिक सहभागी झाले होते. राजगड पार्कपासून या रॅलीस प्रारंभ झाला. अष्टविनायक चौक- झेंडा चौक- साने चौक- अंगणवाडी मार्गे पून्हा राजगड पार्क या मार्गाने हा कॅंडल मार्च काढण्यात आला.
या रॅलीदरम्यान नागरिकांनी ‘”हिंदुस्तान जिंदाबाद- पाकिस्तान मुर्दाबाद,शहीद जवान अमर रहे, भ्याड हल्ल्याचा निषेध असो अशा घोषणा देवून परिसरात दणाणून सोडला. राजगड पार्क २ च्या प्रवेशद्वारावर शोक सभा घेवून या रॅलीची सांगता केली.
रॅली यशस्वी करण्यासाठी सुनील पवार, दादाराव मोरे, नारायण दळवी, निलेश कुदळे, विशाल फडतरे, दत्तात्रय काळे, बाळासाहेब सूर्यवंशी, लालासाहेब फाळके, संतोष लहाने, संतोष खलाटे, राहुल कदम, शिव बहादूर, अविनाश शिंदे, मारुती इंदलकर आदी सभासदांनी पुढाकार घेतला होता.











