न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १८ फेब्रु.) :- चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून “शिवशाही आस्वाद” मराठा थीम लंचचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सिम्बोयसीस स्कूल ऑफ कलिनरी आर्टचे संचालक अतुल गोखले, मि. ईअनधराय वडिवेल रॅडीसन ब्ल्यूचे पाककला तज्ञ इ. अनधराय वडीवेल, शेफ सुजित कुमार उरी फेम अभिनेता अजित शिधये, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, प्राचार्य अजयकुमार राय आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मराठी संस्कृतीची प्राचीन कला व पारंपारिक पध्दतिचे जेवण हे होते. विद्यार्थ्यांनी परिधान केलेला मराठी पारंपारिक पोशाख, सर्वत्र केलेली मराठमोळी सजावट या सर्वामुळे खरोखरच शिवशाही असल्याचे भासत आहे, असे अतिथीनी सांगितले. या मराठा थीम लंच मध्ये पुरणपोळी, गुळवणी, बाजरीची भाकरी, पिठलं, कोथंबीर वडी, मसाले भात, ताक आणि मिरचीचा ठेचा हे व ईतर सर्व पदार्थ मराठी पारंपारिक शैलीत बनविण्यात आले होते. कार्यक्रमाची शोभा वाढविण्याकरिता विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये ‘ शिव वंदना’, ‘पोवाडा’, ‘भाषण’ आणि ‘अप्सरा आली’ या गाण्यावर नृत्य करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी अतुल गोखले व अभिनेते शिधये यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी स्वागत कक्षापासून सर्वत्र केलेली शिवशाही मराठी सजावट, स्वादिष्ट असे मराठी पदार्थ आणि सारे आदरातिथ्य उल्लेखनीय असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करण्याचा सल्ला दिला. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाची प्रगती आणि विद्यार्थ्यांनी केलेला शिवशाही सोहळा अवर्णनीय झाल्याचे सांगत विद्यार्थांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य. अजयकुमार राय यांनी या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले व विद्यार्थानमधील कलागुणांना वाव मिळावा हाच यामागील हेतू आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अजयकुमार राय यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या पडवळ आणि सौरभ राउत यांनी केले. प्रा. रुचिता चौधरी यांनी आभार मानले










