न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पिंपळे गुरव, नवी सांगवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र गणपत जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्री लक्ष्मण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील कदम, प्रा. सुरेश धाडिवाल, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, नितीन सोनावणे, प्रभाग क्रमांक ४१ चे अध्यक्ष राजेंद्र रामसिंग, प्रा. महादेव रोकडे, उद्योजक बालाजी पवार, सुनील इंगळे, शेखर निकम, राजेंद्र कुवर, जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचे सभासद, म्हसोबा रिक्षा स्टँडचे सदस्य, अतुल ससाणे, शैलेश दिवेकर, अजिंक्य जाधव, शुभम भोसले आदी उपस्थित होते. राजेंद्र जगताप यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व क्रांतिकारकांविषयी विचार व्यक्त केले.












