- मोफत विमा, वृक्ष वाटप, शालेय साहित्य, विधवा पेन्शन कार्ड, दिव्यांगांना लायसन्स वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- मराठवाडा जनविकास संघांचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजू नागरिकांना विमा स्वरूपात प्रमाणपत्र, सामाजिक संस्था व नागरिकांना ६ ते ८ फूट उंचीचे जाळीसह दोन हजार वृक्ष वाटप, एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बाल आधार कार्ड, विधवांना पेन्शन कार्ड वाटप, अंध अपंगांना शॉप ऍक्ट लायसन वाटप आदी समजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज (आळंदीकर), समाजप्रबोधनकार ह.भ.प. शारदाताई मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या हस्ते गरजू नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक राजू लोखंडे, जनार्दनबापु जगताप माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, गुरुवर्य दामोदरआण्णा काशीद ह,भ , प विजयआण्णा जगताप सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, प्रगतिशील शेतकरी बैल गाडामालक मा, सखारामतात्या काशीद श्यामभाऊ जगताप, अशोक जगताप, उद्योजक बालाजी पवार, रावसाहेब चौगुले, गणेश जगताप, शशिकांत दुधारे, बुद्धभूषण विहारचे अध्यक्ष पूनाजी रोकडे, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी, महादेव बनसोडे, दत्तात्रय धोंडगे, बळीराम माळी, गोपाळ माळेकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, उद्योजक माधव मनोरे, सुनील काकडे, पी.एम.राठोड, मारुती बानेवार, उद्योजक शंकर तांबे, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, हनुमंत घुगे, सचिन रसाळ, नितीन सोनवणे, नाना तांबारे, प्रदीप गायकवाड, संतोष मोरे, नागेश जाधव, सुनील कदम, पांडुरंग तात्या कदम, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सभासद, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे सभासद, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सभासद,जावेद शेख अध्यक्ष पिंपळे गुरव नवी सांगवी प्रभाग ४५ पिं.चिं.शहर राष्ट्रवादी काँग्रेस पाटीँ, मा.सतिशकुमार चोरमले उपाध्यक्ष पिं.चिं.शहर राष्ट्रवादी काँग्रेस पाटीँ ओबीसी सेल, आरिफ सलमानी, कार्याध्यक्ष अल्पसंख्यक चिंचवड विधानसभा, निसार शेख, सरचिटनिस-सामाजिक न्याय विभाग आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शेळके यांनी, तर आभार वामन भरगंडे यांनी मानले.












