न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरण द्वारे महाराज अग्रसेन उद्यान भक्ती शक्ती येथे श्री अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. सकाळी ठीक ७:३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणास मेजर दत्ता साबळे व ट्रस्टचे अध्यक्ष सुनील अग्रवाल व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ट्रस्टद्वारे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठया संख्यने फोर व्हीलर व बाईकस्वार उपस्थित होते. रॅलीची सुरवात निगडी, प्राधिकरण, आकुर्डीपासून होत चिंचवड येथील अग्रसेन ट्रस्टच्या भवना येथे येऊन समापन झाले. यावेळी मोठ्या संख्येने युवा व महिलांनी देखील रॅलीला चांगला प्रतिसाद दिला. सर्वांना पेढे वाटून आनंद साजरा केला.
चिंचवडस्थित श्री अग्रसेन ट्रस्ट या इमारतीच्यावर ही संस्थांच्या सर्व सभासद, पंच माजी अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुनील अगरवाल, सुभाष बन्सल, सुनील अगरवाल, विनोद बन्सल, गौरव अगरवाल, अशोक बन्सल, जोगिंदर मित्तल, संदीप अगरवाल, के एल बन्सल, जगदीश सिंघल, सागर अगरवाल, धर्मेंद्र अग्रवाल, भीमसेन अगरवाल, प्रेमचंद मित्तल, वेदप्रकाश गुप्ता, रामावतार अग्रवाल, भीमसेन अग्रवाल, मोहन अग्रवाल, सतबीर मित्तल, रमेश बन्सल, दीनदयाल अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, नरेश जैन, डॉ. संतोष अग्रवाल, युवा वर्ग विकास गर्ग, आशिष गर्ग, सचिन मित्तल, तरुण मित्तल, विशाल मित्तल, उमेश मित्तल, राजबाला गर्ग, सारला अगरवाल, सुषमा अगरवाल, रेणू मित्तल, सपना अग्रवाल आदी उपस्थित होते.












