न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- विनापास जबरदस्तीने टिटॉस रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये आरोपी घुसले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत ३० हजार रुपये खंडणीची मागणी केली. आरोपींनी आपल्याकडे बंदुक आहे, असे भासवत फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
हा प्रकार ८ ऑगस्ट रोजी पिंपळे गुरव येथील टीटॉस रेस्टॉरंट ॲण्ड बार येथे मध्यरात्री घडला. विकास अनिल सेवानी (वय २५, रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) यांनी फिर्याद दिली.
अशु ऊर्फ आसिफ हैदर हाफसी (वय २३, रा. कासारवाडी), अत्तु ऊर्फ फैजल ईस्माइल शेख (वय २७, कासारवाडी), ॲग्नल ऊर्फ केविन जॉर्ज ॲन्थॉनी (वय २९, रा. पिंपळे गुरव), सुमेरसिंग हरजितसिंग मान (वय २३, रा. पिंपळे गुरव) यांना अटक करण्यात आली आहे.












