न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- किरकोळ कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात शनिवारी (दि. १६) बाचाबाची आणि भांडण झाले. त्या कारणावरून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आरोपी कोयता घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून आला. मोठमोठ्याने आरडाओरडा शिवीगाळ करून कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली.
त्यांनतर जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि. १४) सायंकाळी चिंचवडगावातील काकडे पार्क येथे हा प्रकार घडला. विश्वजित आजिनाथ भोसले (वय २०, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगेश नंदकुमार सांगळे (वय २१, रा. चिंचवडगाव), गणेश सुरेश सुगडे (वय २१, रा. केशवनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.












