न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने केशवनगर चिंचवड येथे तिथीप्रमाणे राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सकाळी ८:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे जय घोषात मनोभावे पूजन करण्यात आले. शिवजयंती आयोजक महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
अभ्यासक गोविंद देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंजाबराव मोंढे, डॉ. अभिजित भालचंद्र यांनी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी नुकतेच काश्मिर येथे अतिरेकी भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी केमिस्ट असोसिएसशन पिंपरी चिंचवड अध्यक्ष संतोष खिवंसरा, अशोक शिंगाडे, पंजाबराव मोंढे, सिने अभिनेते जयंत जोशी, सौरभ शिंदे, राजेंद्र भागवत, बाळासाहेब सुबंध, पोपट बच्चे, गोविंद देशपांडे, आयर अंकल, आर्षद शेख, गणेश बच्चे, सिद्धू लोणी, अभिजित पवार, दिवाकर खोले, हरीचंद्र कुलकर्णी, दशरथ काका, बरीदे आर. आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.
भाजपा रोजगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले











