न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. १९ फेब्रु.) :- चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अश्वरुढ पुतळ्याचे पुजन आबा खराडे व कृष्णा लोखंडे यांनी केले. शाहीद शेख व राजाराम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेश नवले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा साजरा करीत असताना, महाराजांनी सर्व-धर्म-समभाव आदर्शाचा विचार दिलेला आहे. तीच विचारधारा घेऊन, काॅग्रेसच्या कार्यकर्त्यानी जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे.
यावेळी बापू लोखंडे, रवी साबळे, आदनान शेख, विनोद रत्नम, प्रदीप पवार, रोहित शेळके व पिंपळे गुरवचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.











