न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२२) :- पिस्टल बाळगले असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता आरोपीच्या घरात छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी २५ हजारांचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि ३०० रुपयांचे एक जिवंत काडतूस जप्त केले.
ही कारवाई गुरुवारी (दि. २५) रोजी शस्त्र विरोधी पथकाने केली. पोलीस हवालदार नामदेव वडेकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघेरे (रा.कस्पटे वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


















