न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२२) : – मासे खरेदी केल्यानंतर गुगल पे द्वारे त्याचे पैसे दिले. फिर्यादी यांच्या खात्यातून पैसे वजा झाले. मात्र मासे विक्रेत्याच्या खात्यात ते जमा झाले नाहीत. याबाबत तक्रार करण्यासाठी फिर्यादी यांनी गुगलवर फोन पे चा कस्टमर केअर नंबर शोधला. तिथे फोन पे कस्टमर केअरचा नंबर म्हणून त्यांना आरोपीचा नंबर मिळाला.
फिर्यादी यांनी संपर्क केला असता आरोपीने पैसे परत जमा करण्याचे आश्वासन देऊन त्यांना बोलण्यात गुंतवले. दरम्यान त्यांना गुगल पेवर काही आकडे आणि मेसेज टाईप करण्यास सांगितले आणि चलाखीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या खात्यातून ४५ हजार ५२५ रुपये काढून फसवणूक केली. ही घटना १५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री काळभोरनगर येथे घडली.
ब्रेनडन क्रिस्टो रॉड्रिक्स (वय २६, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. २५) रोजी 916291569698 या क्रमांकावरून बोलणा-या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















