न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- कुख्यात सोन्या काळभोर टोळीने शहरातून रॅली काढल्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर टाकला होता. याची कुणकुण लागताच पोलीस यंत्रणा हरकतीत येत त्यांनी सोन्या काळभोर टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.
जीवन अंगद सातपुते (रा. गंगानगर, आकुर्डी) आणि त्याच्या १५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे हवालदार जमीर बाबालाल तांबाळे यांनी २३ ऑगस्ट २०२२ रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी सातपुते हा मोक्काच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. नुकतोच तो जेलमधून बाहेर आला आहे. २७ जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपींनी खंडोबा माळ ते शितळादेवी चौक, आकुर्डी या रस्त्यावर दुचाकीवरून रॅली काढली. जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणे आणि बेकायदा रॅली काढणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
















