न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२२) :- दुचाकीवरून दोघेजण रविवारी (दि. २८) मध्यरात्री नाशिक फाटा, कासारवाडी येथून भोसरीकडे जात होते. त्यातील एकजण हा दुचाकी चालवत होता. त्याने भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
दुचाकी चालवताना केलेल्या हायगयीमुळे हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. प्रकाश दादासाहेब कदम (वय २७, रा. रहाटणी. मूळ रा. देवगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास वर्मा (वय ३०, पिंपळे गुरव), धीरज पवार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलीस याचा तपास करीत आहेत.
















