न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२२) :- अंडी आणण्यासाठी फिर्यादीची आणि नातेवाईकांच्या मुली या दोघी दुकानात जात होत्या. यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला पाचशे रुपये देऊ करत हात पकडून गैरवर्तन केले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ, मुलगा गेले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
ही घटना शनिवारी (दि. २७) रात्री सव्वादहाच्या दरम्यान नेहरुनगर येथे घडली. २५ वर्षीय तरूणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी पोलिसांनी अतुल मतिलाल पंडुरे (वय ५२ रा.उद्यमनगर, पिंपरी) या आरोपीला अटक केली असून त्याला न्य़ायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















